Home देव धर्म आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि...

आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या

Lunar Eclipse 2025: आज रात्री वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतासह अनेक देशांमधून दिसणार आहे. भाद्रपद पौर्णिमेला होणारं हे ग्रहण खग्रास स्थितीत दिसणार आहे.

Lunar Eclipse 2025

Lunar Eclipseआज रात्री वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतासह अनेक देशांमधून दिसणार आहे. भाद्रपद पौर्णिमेला होणारं हे ग्रहण खग्रास स्थितीत दिसणार आहे. या ग्रहणाचे वेध १२ वाजून ५७ मिनिटांनी लागले आहेत. आता हे ग्रहण किती वाजता सुरू होणार आणि त्याचा स्पर्श, मध्य आणि मोक्ष काळ कधी आहे, हे आपण जाणून घेऊयात.

आज होणारं चंद्रग्रहण शनीची रास कुंभ आणि गुरूच्या नक्षत्रामध्ये लागणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहण लागणं हे खगोलीय घटना म्हणून पाहिलं जातं. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असताना पृथ्वी, चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते.

हे चंद्रग्रहण आज रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी सुरू होईल. तसेच रात्री १ वाजून २६ मिनिटांनी समाप्त होईल. या ग्रहणाचा स्पर्शकाळ हा रात्री ८ वाजून ५९ मिनिटांनी आहे. तर ग्रहणाचा मध्य रात्री ११ वाजून ४२ मिनिटांनी असेल. तर ग्रहाणाचा मोक्ष रात्री २ वाजून २४ मिनिटांनी होईल. म्हणजेच संपूर्ण देशात हे ग्रहण सुमारे ३ तास २८ मिनिटे दिसणार आहे.

Breaking News: Lunar Eclipse 2025

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here