Home अहिल्यानगर अहिल्यानगर: 5 वर्षांच्या बालिकेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

अहिल्यानगर: 5 वर्षांच्या बालिकेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Accident: भीषण अपघातात पाच वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू.

Accident 5-year-old girl dies in truck crash

अहिल्यानगर: एमआयडीसी परिसरात निंबळक-विळद बायपासवरील भारत पेट्रोलपंपासमोर शनिवारी (6 सप्टेंबर) सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. सोनाली नागनाथ बांदल (वय 5, रा. मोरया पार्क, एमआयडीसी, अहिल्यानगर) असे मयत बालिकेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागनाथ राजाराम बांदल (रा. मोरया पार्क, एमआयडीसी, अहिल्यानगर) आपल्या पत्नी व मुलीसह दुचाकीवरून विळद बायपासमार्गे जात होते. ते पेट्रोलपंपाजवळ आल्यावर त्यांनी पत्नी व मुलगी सोनालीला रस्त्याच्या कडेला थांबवून दुचाकी बाजूला लावली. याचदरम्यान तेथेच उभा असलेला ट्रक चालक सतीषकुमार गुलाबसिंग रेपारी (वय 23, रा. भिलडाना, जि. फतेहाबाद) याने निष्काळजीपणे, मागे कोण उभे आहे की नाही याची खात्री न करता ट्रक अचानक जोरात रिव्हर्स घेतला. या वेळी ट्रकच्या मागे उभी असलेली सोनाली ट्रकच्या टायरखाली दबली.

गंभीर जखमी झालेल्या सोनालीला तातडीने उपचारासाठी खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिक्षक विनोद परदेशी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ पंचनामा करून ट्रक चालक सतीष रेपारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक परदेशी पुढील तपास करीत आहेत.

Breaking News: Accident 5-year-old girl dies in truck crash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here