Home संगमनेर संगमनेरात डीजे मालकांवर गुन्हे दाखल

संगमनेरात डीजे मालकांवर गुन्हे दाखल

Breaking News | Sangamner Crime: कर्णकर्कश आवाजात गाणी लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन डीजे मालकांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे.

Crime Cases filed against DJ owners in Sangamner

संगमनेर : ‘ईद-ए-मिलाद ‘निमित्त सोमवारी संगमनेरात कर्णकर्कश आवाजात गाणी लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन डीजे मालकांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. डीजे मालक ऋषिकेश सोमनाथ हासे (रा. राजापूर, ता. संगमनेर) व राहुल सुभाष शिंदे (रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राहुल पांडे व आत्माराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी हासे व शिंदे या दोघांवर गुन्हे दाखल केले. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बंडू टोपे व कानिफ जाधव करत आहेत.

Breaking News: Crime Cases filed against DJ owners in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here