खळबळजनक! तीन वर्षीय चिमुकलीला आधी गळफास देऊन पित्याने संपविले आयुष्य?
Breaking News | Beed Crime: एका तीन वर्षीय चिमुकलीला गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. दोन दिवसांपूर्वीच या चिमुकलीच्या वडिलांनी इमामपूर रोड परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता.
बीड: बीडच्या रामगड परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीला गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. दोन दिवसांपूर्वीच या चिमुकलीच्या वडिलांनी इमामपूर रोड परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. हा सर्व प्रकार कौटुंबिक कारणावरून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातो आहे. दोन दिवसांपूर्वी वडील आणि आज सकाळी मुली मृतदेह लिंबाच्या झाडाला आढळून आला. या घटनेनं बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
जयराम शहादेव बोरवडे आणि अक्षरा जयराम बोरवडे असं मृत झालेल्या पित्याचे आणि चिमूरड्या मुलीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी जयराम आपल्या मुलीला घेऊन घरातून निघून गेला होता. त्यानंतर काही तासातच त्याचा मृतदेह इमामपूर शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र तीन वर्षांची चिमूरडी आढळली नाही. पोलिसांनी परिसरात शोधाशोध केला. मात्र आज सकाळी बीड शहरानजीक रामगड परिसरात तीन वर्षीय अक्षरा बोरवडे या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. प्रथम दर्शनी ही घटना कौटुंबिक वादाच्या कारणावरून झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी जयराम याचा विवाह झाला होता आणि त्याला तीन वर्षांची ही मुलगी झाली या मुलीवर त्याचा फार जीव होता असं नातेवाईकांकडून सांगण्यात आलं. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Breaking News: Father ends life by hanging three-year-old child