जीममध्ये २० वर्षीय तरुणीला व्यायामानंतर चक्कर; हृदयविकाराने झाला मृत्यू
Breaking News | Young Women Heart attack: तरुणीचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर: गुरुवारी सायंकाळी व्यायामानंतर जीममध्ये चक्कर येऊन पडलेल्या २० वर्षीय प्रियंका अनिल खरात या तरुणीचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना बीड बायपास परिसरात घडली. प्रियंका बी. फार्मसी पदवीधर असून, गेल्या महिनाभरापासून भाऊ व मैत्रिणीसह नियमित व्यायाम करण्यासाठी जीममध्ये जात होती.
गुरुवारी सायंकाळी प्रियंका जीमला गेली. भाऊ यश व मैत्रीण प्रणाली कुलकर्णी हे सोबत होते. व्यायामानंतर भावाची वाट पाहात असतानाच तिला चक्कर आली व ती कोसळली. तिला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मैत्रीण म्हणाली, कोणताही त्रास नव्हता
प्रियंकाची मैत्रीण प्रणालीने सांगितले की, जीममध्ये जाताना तिने काही दुखते किंवा काही त्रास असल्याचे सांगितले नाही. हसत खेळत तिने व्यायाम केला. त्यानंतर तिला चक्कर आला.
बीड बायपास येथील म्हस्के पेट्रोलपंपाशेजारील अपार्टमेंटमध्ये प्रियंका कुटुंबासह राहात होती. तिचे वडील अनिल खरात हे कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे पोलिस हवालदार आहेत. प्रियंका कुटुंबातली मोठी मुलगी होती.
अशा घटना कशा टाळता येतील ?
कमी वयात हृदयविकाराने मृत्यू किंवा जीममध्ये हृदयविकाराने मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गणेश सपकाळ यांनी काही सूचना दिल्या.
व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करणे खूप आवश्यक आहे. वॉर्मअपशिवाय २ कोणताही व्यायाम करता कामा नये.
व्यायाम करताना डिहायड्रेशन होणार 3 नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अधूनमधून पाणी पीत राहावे.
डिहायड्रेशन झाले तर रक्तदाब कमी ४ होऊन चक्कर येऊन प्रसंगी जिवाला धोका उद्भवतो. आजारी असताना व्यायाम करणे टाळावे.
Breaking News: 20-year-old woman faints after exercising at gym dies of heart attack