Home अहिल्यानगर अहिल्यानगर: तरूणाकडून तरुणीवर अत्याचार

अहिल्यानगर: तरूणाकडून तरुणीवर अत्याचार

Breaking News | Ahilyanagar Crime: तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी, हॉटेल मध्ये नेले आणि जबरदस्तीने अत्याचार. (Rapes)

Young man rapes young woman

अहिल्यानगर:  नगर शहरात शिक्षण घेणार्‍या पाथर्डी तालुक्यातील तरुणीची ओळख मोबाईल गेम खेळताना मोहम्मद अजमल वासीम (रा. सुखपुर, जि. समस्तीपूर, बिहार) या तरुणाशी झाली. सुरुवातीला फोनवर बोलणे सुरू झाले, त्यानंतर तो अहिल्यानगरला आला आणि दोघे काहीवेळा शहरातील विविध ठिकाणी भेटले. त्या तरूणाने तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

अजमल वासीम याने पीडित तरुणीवर दबाव आणून तिला हॉटेलमध्ये नेले. 3 ऑगस्ट 2025 रोजी रेल्वे स्टेशनजवळील हॉटेलमध्ये तरूणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या वेळी दोघांचे फोटो काढले गेले. यानंतर 16 ऑगस्ट 2025 रोजी त्याने पुन्हा गंगा उद्यानात बोलावून भेट घेतली आणि नंतर स्वतःच्या रूमवर घेऊन गेला. त्यावेळीही मोबाईलमध्ये फोटो काढले गेले. 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अजमल वासीम याने तरुणीला फोन करून पुन्हा भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनला बोलावले. तरुणीने नकार दिल्यावर, त्याने तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिली.

धमकीमुळे ती अनिच्छेने गेली असता, त्याने पुन्हा हॉटेल मध्ये नेले आणि जबरदस्तीने अत्याचार केला. पीडित तरुणीने अखेर धैर्य दाखवत कोतवाली पोलिस स्टेशन गाठले आणि घटनेची सविस्तर तक्रार नोंदवली. पोलिसांनी संशयित आरोपी अजमल वासीम याला ताब्यात घेतले असता, त्याला अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपी अजमल वासीम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Breaking News: Young man rapes young woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here