Home अकोले अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्या; अकोलेत रस्तारोको

अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्या; अकोलेत रस्तारोको

Breaking News | Akole: अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दाखल झालेला गुन्हा खोटा असल्याचा आरोप करीत शनिवारी अकोलेत बंद पाळण्यात आला.

Withdraw the crime of atrocity Akolet Rasta Roko

अकोले : आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे हे संपूर्ण तालुक्याचे दैवत आहे. त्यांचा पुतळा हलविण्याच्या अनुषंगाने दोघांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दाखल झालेला गुन्हा खोटा असल्याचा आरोप करीत शनिवारी अकोलेत बंद पाळण्यात आला. तसेच, गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी बहुजन समाजाच्यावतीने रस्त्यावर टायर पेटवून काही वेळ रस्ता रोको आंदोलन केले. सभा घेऊन घटनेचा निषेध करण्यात आला.

क्रांतिकारक, महापुरुषांना समाजासमाजाने वाटून घेऊ नये. महापुरुष हे कोण्या एका समाजाचे नसतात, संपूर्ण महाराष्ट्रातील रहिवाशांचे ते श्रद्धास्थान असतात. महापुरुषांचे अनुषंगाने समाजात वितुष्ट येऊ नये, तालुक्याचा सामाजिक सलोखा अबाधित राहावा, यासाठी खोटे गुन्हे मागे घ्यावेत, असे अरिफ तांबोळी यांनी शनिवारी झालेल्या निषेध सभेत स्पष्ट केले.

यावेळी सुरेश नवले यांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करणाऱ्यास समाजकल्याणकडून आर्थिक मदत मिळते, या पैशांवर डोळा ठेवून खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे म्हटले.

खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. प्रदीप हासे यांनी पोलिस प्रशासनाचा निषेध केला. जातीय सलोखा बिघडविण्याचं काम करू नका, गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा त्यांनी दिला. गुरव समाज संघटनेच्या वतीने अशोक पांडे यांनी निषेध व्यक्त केला. कल्पना फापाळे, नीता आवारी, स्वाती शेणकर, शरद नवले, वसंत मनकर, महेश नवले, प्रमोद मंडलिक, बाळासाहेब, माधव तिटमे, नामदेव गोर्डे, जगदीश चौधरी, लालू दळवी, अशोक पांडे, शरद नवले, दत्ता नवले, संदीप शेणकर, संदीप कडलग, कवी भांगरे, अरिफ तांबोळी, भाऊसाहेब नाईकवाडी यांची भाषणे झाली. अकोले तालुका स्थापत्य अभियंता संघटनेच्यावतीने पत्रक काढून खोट्या अॅट्रॉसिटीचा निषेध करण्यात आला. मोर्चाने जाऊन पोलिसांना निवेदन देण्यात आले.

Breaking News: Withdraw the crime of atrocity Akolet Rasta Roko

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here