संगमनेर: प्रवरा नदीपात्रात मृतदेह आढळला
Breaking News | Sangamner: प्रवरा नदीच्या पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
संगमनेर : प्रवरा नदीच्या पात्रात रविवारी (दि. १४) सकाळी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रवरा नदीच्या पात्रात पहिल्या घाटाजवळ मृतदेह काही नागरिकांनी पाहिला. त्यानंतर शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचले. शहरातील जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक मुकेश नरवडे यांच्यासह रोहित परदेशी, ओमकार नरवरे, संतोष खरात, शिवाजी काळण, स्वप्निल घेगडमल यांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
Breaking News: Body found in Pravara riverbed