Home संगमनेर लाटेत निवडून आलेल्यांचे सुडाचे राजकारण- माजी मंत्री थोरातांचे टीकास्त्र

लाटेत निवडून आलेल्यांचे सुडाचे राजकारण- माजी मंत्री थोरातांचे टीकास्त्र

Breaking News | Sangamner | Balasaheb Thorat: सहकार चळवळ मोडीत काढण्याचे षड्यंत्र विरोधकांकडून रचले जात आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे तरुणांची माथी भडकवून, राजकीय फायदा उठविला जात आहे.

Revenge politics of those elected in waves - Former Minister Balasaheb Thorat

संगमनेरः संगमनेर तालुक्यावर सध्या दररोज नव-नवीन संकटे ओढवत आहेत. त्यांचा सामूहिकरित्या मुकाबला करावा लागणार आहे. येथील सहकार चळवळ मोडीत काढण्याचे षड्यंत्र विरोधकांकडून रचले जात आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे तरुणांची माथी भडकवून, राजकीय फायदा उठविला जात आहे.

कोणाच्यातरी इशाऱ्यावरून येथे सुडाचे राजकारण केले जात आहे, असा घणाघाती आरोप करुन, लाटेत निवडून आलेल्यांना जनभावना कळणार नाही, असा खोचक टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, आमदार अमोल खताळ यांचा नामोल्लेख न करता लगावला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या 58 व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग घुले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, रणजीत देशमुख, इंद्रजित थोरात, माधवराव कानवडे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, मोठ्या कष्टातून संगमनेरला पाणी मिळवून दिले. याकामी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे मोलाचे योगदान आहे. येथील माळरानावर साखर कारखाना उभा राहिला. या तालुक्यातील सहकारी संस्था केवळ तालुक्यातचं नव्हे, तर राज्यात अग्रेसर आहेत. सहकार व इथल्या संस्था जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

तरुण पिढीला या तालुक्याचा इतिहास माहिती नाही, मात्र आता तरुणांनी वस्तुस्थिती समजावून घेऊन, चुकीच्या व खोट्या माहितीपासून दूर राहिले पाहिजे. गेल्या चाळीस वर्षात मी कधीही विश्रांती घेतली नाही. ‘आम्ही काय केले,’ असा प्रश्न कोणी विचारल्यास, याचे उत्तर जनतेने पुढे येवून दिले पाहिजे, असे आवाहन करुन, थोरात म्हणाले की, येथील विकास कामात अडथळा आणला जात आहे. प्रशासनदेखील विनाकारण अनेकांना त्रास देत आहे.

या तालुक्यातील शांतता टिकाऊ म्हणून सतत पुढाकार घेतला, मात्र आता जिरवा जिरवीचे राजकारण सुरू झाले आहे. रोजगार, महागाई, शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयांवर कुठलीही चर्चा होत नाही. महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित केले जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

डॉ. तांबे म्हणाले की, संघर्षातून संगमनेर तालुक्याला 30 टक्के हक्काचे पाणी मिळाले. बाळासाहेब थोरातांनी निळवंडे धरण पूर्ण केले. निळवंडेचे 40 टक्के पाणी या तालुक्याला मिळत आहे. या कामातून तालुक्याचा राज्यात लौकिक निर्माण केला आहे. आज संगमनेर मॉडेल देशभर आदर्शवत ठरत आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भोजापूर चारीवरून सत्ताधारी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

‘प्रत्यक्ष कामाशिवाय गावाची, तालुक्याची अन् जिल्ह्याची प्रगती होत नाही. 35 वर्ष खासदारकी तुमच्याकडे होती, पण तुम्ही एक खडा तरी उचलला का? विरोधक फक्त भाषणं करून, मिरवणुका काढून लोकांना भ्रमित करतात,’ असा टोला थोरातांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता लगावला.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, “मोठे कार्यक्रम झाले, घोषणा दिल्या, मिरवणुका निघाल्या. मात्र पाच ते सहा महिन्यात भोजापूर चारीला पाणी आपोआप येते का? आमच्या सत्तेत असताना चारीचे काम आम्ही केले. सुदैवाने यावर्षी मे महिन्यात पाऊस भरपूर पडल्याने पाणी आले आणि खालीही गेले.” काम सगळे आम्ही केले, पण तुम्ही खोट्या-नाट्या गोष्टींचे श्रेय घेता. आयत्या पीठावर रेघोट्या ओढता, अशा शब्दांत थोरात यांनी टीका केली.

’35 वर्ष खासदारकी तुमच्याकडे होती, पण तुम्ही एक खडा तरी उचलला का? विरोधक फक्त भाषणं करून, मिरवणुका काढून लोकांना भ्रमित करतात. प्रत्यक्ष काम केल्याशिवाय तालुक्याची प्रगती होत नाही. आम्ही जेव्हा सत्तेत होतो, तेव्हा प्रत्यक्ष कामे केली. आता तेच काम तुम्ही आपले म्हणून मिरवता हे लोकांना माहीत आहे,’ अशी फटकेबाजी देखील थोरातांनी केली.

यावेळी सदाशिव नवले, तात्याबा बोराडे, भास्कर वर्षे, संग्राम जोंधळे, अण्णा राहिंज, बाळासाहेब देशमुख, मोहनराव करंजकर या सभासदांनी मनोगत व्यक्त केली. एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकरी बांधवांचा कारखान्याच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Breaking News: Revenge politics of those elected in waves – Former Minister Balasaheb Thorat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here