संगमनेर तालुक्यात अजगर पाहताच शेतकऱ्याची भंबेरी उडाली, दहा फूट लांबीचा आणि मांडीच्या आकाराचा आजगर
Breaking News | Sangamner: दहा फूट लांबीचा आणि मांडीच्या आकाराचा हा आजगर.
संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे एका शेतकऱ्याच्या घरासमोरील मूर घासच्या बॅगेत दहा फुटांचा अजगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे तात्काळ याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. यावेळी सर्पमित्र दगडू रुपवते आणि सचिन अरगडे शिताफीने अजगराला पकडलं आणि वनविभागाच्या स्वाधिन केलं.
अधिक माहिती अशी की, सोमवारी (15 सप्टेंबर 2025) शेतकरी सोमनात किसन गुंजाळ यांना त्यांच्या घरासमोरील मूर घासच्या बॅगेत अजगर आढळून आला. त्यांनी लगेच गावातील सर्पमित्र दगडू रुपवते आणि सचिन अरगडे यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच दोघांनीही तात्काळ सोमनाथ यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी अतिशय शिताफीने मूर घासच्या बॅगेमधून अजगराला बाहेर काढलं. जवळपास दहा फूट लांबीचा आणि मांडीच्या आकाराचा हा आजगर होता. खांडगावात पहिल्यांदाच दहा फुटाचा अजगर सापडल्याने ग्रामस्थांनी अजगाराला पाहण्यासाठी गर्दी गेली होती. अजगराला पकडून सर्पमित्रांनी वनविभागाकडे सुपूर्त केलं आहे. तसेच साप दिसल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सर्पमित्रांना ग्रामस्थांना केलं आहे.
Breaking News: Farmer’s panic sets in after seeing python in Sangamner taluka