Home अहिल्यानगर नातवाच्या बर्थडेनिमित्त रुम बुकींग केलं, साई दर्शनासाठी आले अन्…; शिर्डीत भक्तासोबत धक्कादायक...

नातवाच्या बर्थडेनिमित्त रुम बुकींग केलं, साई दर्शनासाठी आले अन्…; शिर्डीत भक्तासोबत धक्कादायक घडलं?

Breaking News | Ahilyanagar: साईबाबा संस्थानच्या नावाशी साधर्म्य असलेली एक बनावट वेबसाईट.

shocking incident happened to a devotee in Shirdi

अहिल्यानगर: शिर्डीतील जगप्रसिद्ध साईबाबा संस्थानच्या नावाचा वापर करून भाविकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साईबाबा संस्थानच्या नावाशी साधर्म्य असलेली एक बनावट वेबसाईट तयार करण्यात आली. याद्वारे भक्तनिवास आणि दर्शनाचे ऑनलाईन बुकिंग दिले जात होते. या प्रकरणी साईबाबा संस्थानने तात्काळ दखल घेत शिर्डी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस सायबर तज्ञांच्या मदतीने या रॅकेटचा शोध घेत आहेत.

या फसवणुकीचा प्रकार नुकताच कर्नाटक येथील साईभक्त रामू जाधव यांच्या बाबतीत उघडकीस आला. आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त ते कुटुंबासह शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी एका वेबसाईटवरून साईबाबा संस्थानच्या भक्तनिवासात ऑनलाइन रूम बुक केली होती. मात्र, जेव्हा ते शिर्डीतील भक्तनिवासात पोहोचले. तेव्हा त्यांना त्यांच्या नावाने कोणतेही बुकिंग नसल्याचे समजले. यानंतर त्यांनी साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. यानंतर त्यांना आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

ही घटना समोर आल्यानंतर साईबाबा संस्थानने तातडीने कठोर पावले उचलली. साई संस्थानच्या नावाचा गैरवापर करून भाविकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे. तसेच, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून पोलीस तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.

Breaking News: shocking incident happened to a devotee in Shirdi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here