Home कोल्हापूर धक्कादायक! पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात गेली अन्…

धक्कादायक! पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात गेली अन्…

Breaking News | Crime: येथील अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर.

She went to the hospital because she had a stomach ache and

हातकणंगले : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता टोप (ता. हातकणंगले) येथील अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकारानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रणित धोंडीराम कांबळे (वय २०, रा. राजीव गांधीनगर टोप) या युवकाविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित फिर्यादी सतरा वर्षीय युवती व आरोपी प्रणित कांबळे टोप येथे राहतात. फिर्यादी मुलीने दिलेल्या माहितीनुसार, युवकाने गेल्या काही महिन्यांपासून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यात ती गर्भवती झाली. तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या पीडित मुलीने सरकारी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यामुळे प्रणित कांबळे यांच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शिरोली पोलिसांना याची माहिती मिळताच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Breaking News: She went to the hospital because she had a stomach ache and

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here