Home नाशिक अवैध कुंटनखान्यावर ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटचा छापा

अवैध कुंटनखान्यावर ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटचा छापा

Breaking News | Nashik Crime: बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला व छापा टाकत कारवाई केली.

Human Trafficking Unit raids illegal brothel

दिंडोरी: रोहिदास नगर येथे हिराबाई बबन चव्हाण (वय ६०) ही महिला घरीच अवैधरित्या कुंटनखाना चालवत असल्याची गुप्त माहिती ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटला मिळाली. खात्री करण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला व छापा टाकत कारवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी २८ वर्षीय पीडितेची सुटका केली असून, तिच्याकडून आर्थिक फायद्यासाठी अनैतिक व्यवसाय करून घेतल्याप्रकरणी हिराबाई चव्हाण विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला सुधारगृहात पाठविण्यात येणार आहे.

या प्रकरणी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटचे हवालदार बाळकृष्ण पजई यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी हे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Breaking News: Human Trafficking Unit raids illegal brothel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here