अकोले-राजूर रस्त्यावर कार व दुचाकीचा अपघात, खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकी थेट कारवर
Breaking News | Akole Accident: रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार थेट समोरून येणाऱ्या कारवर जाऊन धडकला.
अकोले: रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार थेट समोरून येणाऱ्या कारवर जाऊन धडकला. अकोले-राजूर रस्त्यावरील पथिक पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी (दि.१८) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून, ते रुंभोडी येथील रहिवासी असल्याचे समजते. त्यांच्यावर अकोलेतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रामचंद्र मेंगाळ, वृषाली कडाळी व रोहिणी मेंगाळ अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. यातील रामचंद्र मेंगाळ हे गंभीर जखमी झाले. आहेत तर वृषाली कडाळी या तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रोहिणी मेंगाळ यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातातील कार ही अंबड येथील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची असल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. या अपघातातील जखमींना येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारांकरिता दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत
अकोले पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. दरम्यान, कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील खड्ड्यांबाबत दैनिक सार्वमतने वेळोवेळी आवाज उठविला आहे. तरीही गेंड्याची कातडी धारण केलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांना कोणतेही देणे घेणे उरलेले नसल्याची संतप्त भावना उपनगराध्यक्ष शरद नवले यांनी व्यक्त केली आहे.
Breaking News: Car and bike accident on Akole-Rajur road