प्रेमीयुगलाने गळफास घेऊन जीवन संपविले; विवाहित तरुण व अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने खळबळ
Breaking News | Yavatmal Love Affair Suicide : प्रेमीयुगलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे विवाहित तरुण आणि अल्पवयीन मुलीने महागाव (जि. यवतमाळ): सचिन कैलास पवार (वय ३०) व अल्पवयीन मुलगी (राहणार काळी टेंभी) या प्रेमीयुगलाने गुरुवारी (ता. १८) दुपारी एक वाजताच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन मुलीचे आई-वडील शेतात कामाला गेले होते. घरात कुणी नसल्याचे पाहून सचिन व या मुलीने घरातील दोरीला गळफास घेत आपले जीवन संपविले. दोघेही एकाच दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.
यामुळे गावात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर परिसरात आत्महत्या नसून घातपात असावा, अशीही चर्चा रंगली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
त्यानंतर दोन्ही मृतदेह सवना ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. रात्री उशिराच त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. मृत सचिन पवार हा विवाहित असून त्याला दोन लहान मुले आहेत. त्यामुळे त्याने अल्पवयीन मुलीसोबत असे टोकाचे पाऊल उचलल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत मुलीचे वय कमी असल्याने या घटनेने कायद्याच्याही दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. या दुहेरी आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमागचे खरे कारण नेमके काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Breaking News: Couple commits suicide Death of married man and minor girl causes stir