Home बीड शिक्षणाधिकाऱ्याचा नववीतील मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

शिक्षणाधिकाऱ्याचा नववीतील मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Breaking News | Beed Crime: केक आणण्यासाठी चाललेल्या नववीच्या वर्गातील मुलीवर प्रभारी गटशिक्षणाधिकारी याचा अत्याचार करण्याचा प्रयत्न.

Education officer attempts to rape ninth grade girl

केज (जि. बीड): केक आणण्यासाठी चाललेल्या नववीच्या वर्गातील मुलीवर प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार केज तालुक्यात गुरुवारी रात्री घडला. बेडसकरविरोधात केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या तो फरारआहे.

गुरुवारी रात्री पीडित मुलगी मावशीसोबत केक आणायला जात असताना बेडसकरने त्यांना आपल्या कारमध्ये बसवले. त्यानंतर त्यांना निर्जनस्थळी नेऊन त्याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलगी आणि तिच्या मावशीने आरडाओरड केल्यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र, मागून एक वाहन येत असल्याचे पाहून घाबरलेल्या बेडसकरने त्याची कार आणि मोबाइल तिथेच सोडून पळ काढला. या घटनेनंतर शुक्रवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार दिली.

Breaking News: Education officer attempts to rape ninth grade girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here