Home अकोले भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस, जिल्ह्यात पावसाचा अलर्ट वाढला

भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस, जिल्ह्यात पावसाचा अलर्ट वाढला

Breaking News | Ahilyanagar Rain Uodate: भंडारदरा धरण परिसर आणि पाणलोटात काल रविवारी सायंकाळी 6 वाजेपासून जोरदार पाऊस सुरू.

Heavy rain in Bhandardara watershed, rain alert raised 

भंडारदरा: भंडारदरा धरण परिसर आणि पाणलोटात काल रविवारी सायंकाळी 6 वाजेपासून जोरदार पाऊस सुरू होता. पाच साडेपाच वाजल्यापासून हळुवार पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर काही वेळातच अधूनमधून जोरदार सरी कोसळण्यास सुरूवात झाली.

जोरदार पाऊस कोसळत असल्याने डोंगर दर्‍यांवरील धबधबे पुन्हा जोरदार सुरू झाले आहेत. ओढे-नालेही भरभरून वाहु लागले आहेत. धरणात नव्याने पाण्याची आवक वाढू लागल्याने नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. निळवंडेतही आवक वाढू लागल्याने या धरणातून खाली प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात आधी 23 तारखेपर्यंत विजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, यात एक दिवसाची वाढ करण्यात आली असून आता जिल्ह्यात 24 तारखेपर्यंत जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट राहणार आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशीरापर्यंत आणि रविवारी सायंकाळी जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस झाला आहे.

या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साठले असून हा पाऊस रब्बी हंगामातील पेरण्यासाठी उपयुक्त राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात पडणार्‍या पावसात तालुकानिहाय तफावत दिसून येत असून विशेष करून नगर जिल्ह्यातील उत्तर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे, तर दक्षिण विभागात जादा आहे. गेल्या आवठड्यात हवामान विभागाने जिल्ह्यातील परतीचा पावसाचा मुक्काम लांबणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Breaking News: Heavy rain in Bhandardara watershed, rain alert raised 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here