Home अकोले अकोलेतील कार दुचाकी अपघातातील जखमीचा मृत्यू

अकोलेतील कार दुचाकी अपघातातील जखमीचा मृत्यू

Breaking News | Akole Accident Death: कार व दुचाकीच्या अपघातातील जखमी रामचंद्र लक्ष्मण मेंगाळ यांचे उपचारादरम्यान रविवारी (दि. २१) सकाळी निधन.  

Person injured in car-bike accident in Akole dies

अकोले : राजूर रस्त्यावर पाणओढ्यात गुरुवारी (दि. १८) झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातातील जखमी रामचंद्र लक्ष्मण मेंगाळ यांचे उपचारादरम्यान रविवारी (दि. २१) सकाळी निधन झाले. दुपारी त्यांच्या मूळगावी अकोले तालुक्यातील गर्दणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या घटनेबाबत सोशल मिडियावरील पोस्ट व्हायरल झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली.

रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार थेट समोरून येणाऱ्या कारवर जाऊन धडकला. अकोले-राजूर रस्त्यावरील पथिक पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी (दि.१८) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले

रामचंद्र मेंगाळ, वृषाली कडाळी व रोहिणी मेंगाळ अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. यातील रामचंद्र मेंगाळ हे गंभीर जखमी झाले. तर वृषाली कडाळी या तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रोहिणी मेंगाळ यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातातील कार ही अंबड येथील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची असल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. या अपघातातील जखमींना येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारांकरिता दाखल करण्यात आले होते.

Breaking News: Person injured in car-bike accident in Akole dies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here