Home अहिल्यानगर आपल्यात जे झाले ते विसरून जा,  पोलिसाकडून महिलेवर अत्याचार, अहिल्यानगर हादरलं!

आपल्यात जे झाले ते विसरून जा,  पोलिसाकडून महिलेवर अत्याचार, अहिल्यानगर हादरलं!

Breaking News | Ahilyanagar Crime :  एका 30 वर्षीय तरुणीने बलात्कार, दमदाटी, आणि जीवे मारण्याच्या धमकीसंदर्भात गंभीर तक्रार दाखल केली.

Forget what happened between us, police abused woman

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे  यांच्याविरोधात एका 30 वर्षीय तरुणीने बलात्कार, दमदाटी, आणि जीवे मारण्याच्या धमकीसंदर्भात गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी तो मनोर पोलीस स्टेशन, पालघर (जि. ठाणे) येथे वर्ग करण्यात आला आहे.

तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत, आरोपी प्रताप पांडुरंग दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. हे संबंध पालघर येथील फार्महाऊस, तसेच जोगेश्वरी वेस्ट, मुंबई येथे ठेवण्यात आले, असा आरोप आहे.

पीडितेने जेव्हा लग्नासाठी आग्रह धरला, तेव्हा आरोपीने तिला “जे काही आपल्यात घडलं, ते विसरून जा” असे म्हणून शिवीगाळ केली आणि पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्न करताच “तुला जे करायचं ते कर” अशी दमदाटी दिली, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली गेली असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणामुळे संपूर्ण अहिल्यानगर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर इतका गंभीर आरोप झाल्यामुळे पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असून, आरोपीवर कायदेशीर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Breaking News: Forget what happened between us, police abused woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here