Home पुणे राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवलेल्या नेत्याच्या बॅगेत आढळले रिव्हॉल्वर, पाच काडतुसे

राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवलेल्या नेत्याच्या बॅगेत आढळले रिव्हॉल्वर, पाच काडतुसे

Breaking News | Pune Crime: बॅगेत रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसे आढळून आले.

Revolver, five cartridges found in bag of NCP leader contesting assembly elections

पुणे : पुणे विमानतळावर शुक्रवारी रात्री मोठी खळबळ उडाली. माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत प्रभाकर बागल  यांच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसे आढळून आले. पुणे ते वाराणसी या प्रवासादरम्यान विमानतळावरील सुरक्षा चौकशीदरम्यान ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात (गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत बागल (63, रा. गादेगाव, ता. पंढरपूर) हे शुक्रवारी रात्री वाराणसीला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आले होते. चेक-इन प्रक्रियेपूर्वी त्यांच्या बॅगेची तपासणी सीआयएसएफ व विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी स्कॅनरमधून केली असता, बॅगेत रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतुसे असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी संबंधित शस्त्र जप्त केले.

बागल यांनी संबंधित शस्त्रासाठी शस्त्र परवाना घेतलेला असला तरी, तो परवाना फक्त महाराष्ट्र राज्यापुरता वैध असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे ते हे शस्त्र घेऊन विमानातून दुसऱ्या राज्यात प्रवास करू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर, बागल यांच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 30 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीनंतर बागल यांना नोटीस बजावून सोडण्यात आले आहे. 

चंद्रकांत बागल हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून, त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यापूर्वी ते जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही कार्यरत होते.

Breaking News: Revolver, five cartridges found in bag of NCP leader contesting assembly elections

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here