Home अहिल्यानगर अहिल्यानगर: पीआय दराडे हनीट्रॅपच्या जाळ्यात

अहिल्यानगर: पीआय दराडे हनीट्रॅपच्या जाळ्यात

Breaking News | HoneyTrap: तरूणीने अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर दराडे यांनी मंगळवारी सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संबंधीत तरूणीसह तिला मदत करणार्‍या अनोळखी व्यक्तीविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल.

PI Darade falls into the honeytrap trap

अहिल्यानगर: पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याविरूध्द तरूणीने अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर दराडे यांनी मंगळवारी सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संबंधीत तरूणीसह तिला मदत करणार्‍या अनोळखी व्यक्तीविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दराडे हे ‘हनीट्रॅप’ प्रकरणात अडकले असल्याची चर्चा जिल्हा पोलीस दलात रंगू लागली आहे. दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

दराडे यांच्या नातेवाईकांच्या मुंबईतील हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणार्‍या तरूणीसोबत त्यांची ओळख झाली. काही महिन्यांतच ओळख जवळीक झाली आणि तिने वैयक्तिक कारणास्तव दराडे यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. 2 लाख 10 हजार रुपयांहून अधिक रक्कम वेगवेगळ्या कारणांनी दराडे यांच्याकडून तरूणीने घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, दराडे यांनी तरूणीशी साधलेली जवळीक त्यांना अडचणीची ठरली. तरूणीने त्यांना हळूहळू धमक्यांचा सूर चढवत तुम्हाला हनीट्रॅपमध्ये अडकवीन, खोटी अत्याचाराची केस करीन अशा थेट धमक्या द्यायला सुरूवात केली.

केवळ धमक्या न देता आधी 2 कोटी व नंतर 1 कोटी रुपयांची सरळसरळ मागणी करण्यात आली. 16 सप्टेंबर रोजी तर थेट कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन दोन कोटी रूपये द्या नाहीतर सर्वांसमोर हार घालून लग्न करा, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिली.

दरम्यान, तरूणीच्या धमक्यांचे पुरावे व्हॉट्सअ‍ॅप चॅट, कॉल रेकॉर्ड व सीसीटीव्हीत असल्याचा दावा दराडे यांनी फिर्यादीत केला आहे. तरूणीने सोमवारी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर दराडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. संबंधीत तक्रारीची चौकशी अपर पोलीस अधीक्षक यांनी करून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश दिल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पीआय दराडे यांच्या भोवती हनीट्रॅपचे जाळे त्यांच्याच जवळच्या व्यक्तीने टाकले असल्याची चर्चा जिल्हा पोलीस दलात सुरू आहे. तरूणीने अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी हा सर्व कट रचला गेला असल्याचे बोलले जात आहे. पोलीस खात्यातील व्यक्ती यामध्ये सहभागी असल्याची शक्यता असून यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. संबंधीत व्यक्तींनी सुरूवातील दराडे यांच्यासोबत जवळीक साधली. नंतर त्यांच्यासोबत काम केले आणी शेवटी त्यांनाच अडचणीत आणले. हे प्रकरण केवळ वैयक्तिक फसवणूक नसून, हनीट्रॅप ही संगनमताने आखलेली जाळेबाजीची खेळी असल्याची शंका तपासात घेतली जात आहे.

Breaking News: PI Darade falls into the honeytrap trap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here