अहिल्यानगर: अत्याचार प्रकरणातील आरोपीकडून मेहुण्याचा खून
Breaking News | Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील पोलीस कोठडीत असलेला आरोपी बजरंग साळुंखे याने दिलेल्या कबुली जबाबामुळे धक्कादायक घटना. शेतात उकरून मृतदेह शोधून काढला.
राहुरी: राहुरी तालुक्यातील दवणगाव परिसरातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील पोलीस कोठडीत असलेला आरोपी बजरंग साळुंखे याने दिलेल्या कबुली जबाबामुळे धक्कादायक घटना समोर आली. बजरंग साळुंखे याने सहा महिन्यांपूर्वी त्याच्या मेहुण्याला जिवे मारून घराच्या पाठीमागे पूरल्याचे सांगितले. काल मंगळवारी पोलीस पथकाने शेतामध्ये उकरून मृतदेह शोधून काढला.
राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील बजरंग साळुंखे याने तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार होता. आठ दिवसांपूर्वी पीडित मुलींनी स्नेहालयाच्या मदतीने राहुरी पोलीस ठाण्यात बजरंग कारभारी साळुंखे याच्यासह त्याचा मुलगा पृथ्वीराज बजरंग साळुंखे, पत्नी शीतल बजरंग साळुंखे तसेच शीतल हिचा भाऊ निलेश गाडेकर अशा चार जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी बजरंग साळुंखे व शितल साळुंखे यांना पोलीस पथकाने अटक केली होती. पोलीस कोठडीत असताना धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की, त्याचा मेहुणा निलेश गाडेकर हा कायम दारू पिऊन वाद घालायचा. त्याला कंटाळून सहा महिन्यांपूर्वी एप्रिल महिन्यातील एका दिवशी सकाळी 11 वाजता निलेश गाडेकर याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर घराच्या पाठीमागे शेतात खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरला. पोलीस पथकाने काल दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी आरोपीला घेऊन घटनास्थळी धाव घेतली. आरोपीने ठिकाण दाखवल्यानंतर देवळाली प्रवरा नगरपरिषद मधील कर्मचार्यांच्या मदतीने शेतात उकरून मृतदेह शोधून काढला.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, नायब तहसीलदार संध्या दळवी, आरोग्य अधिकारी श्रीमती खान, ठसे तज्ज्ञ व पोलीस कर्मचारी नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सतिश कुर्हाडे, शिंदे, आजिनाथ पाखरे, सुरज गायकवाड, राहुल यादव, गणेश लिपनी, गोवर्धन कदम, आदिनाथ चेमटे, महिला पोलीस कर्मचारी वंदना पवार, ग्रामसेविका प्रतिभा पागिरे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच दवणगाव सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. एका गुन्ह्याचा करताना दुसरा खुनाचा गुन्हा उघड झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले.
Breaking News: Brother-in-law murdered by accused in abused case