Home संगमनेर संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक व्यक्ती जागीच ठार; पोलीस घेतायेत शोध

संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक व्यक्ती जागीच ठार; पोलीस घेतायेत शोध

Breaking News | Sangamner: चाललेल्या एका अज्ञात वाहनाने एका अज्ञात व्यक्तीला जोराची धडक मारून सदर वाहन जागी न थांबता पुढच्या दिशेने सुसाट निघून गेले असून या दुर्दैवी घटने मध्ये सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेने एकच खळबळ.

One person died on the spot after being hit by an unknown vehicle

संगमनेर : रात्री दोन ते तीन च्या सुमारास सुसाट चाललेल्या एका अज्ञात वाहनाने एका अज्ञात व्यक्तीला जोराची धडक मारून सदर वाहन जागी न थांबता पुढच्या दिशेने सुसाट निघून गेले असून या दुर्दैवी घटने मध्ये सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 ला मध्यरात्री रात्री साधारण 2 ते 3 च्या सुमारास घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. खांडगाव फाटा ते संगमनेर दरम्यान हा अपघात झाला असून सदर व्यक्ती पायी जात असताना कोणत्या तरी अज्ञात वाहनाने या व्यक्तीला जोराची धडक दिल्याचे समजते. या घटनेबाबत बाबत संगमनेर शहर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर व्यक्तीचे नाव अथवा पत्ता अद्याप पावेतो सापडला नसून पोलीस कसून शोध घेत आहेत.

या अपघातामध्ये व्यक्ती पूर्णतः रक्तबंबाळ झाल्याने कपडे रक्ताने माखलेले आढळून आले. तसेच त्यांच्या अंगावर हिरव्या रंगाचे बनियन असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र सहाने, पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश हासे पुढील तपास करीत असून या व्यक्ती बाबत कोणास काही माहिती असल्यास 9604197844 /  9309983906  या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Breaking News: One person died on the spot after being hit by an unknown vehicle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here