Home बुलढाणा धक्कादायक! प्रेयसीवर हल्ला, नंतर स्वतःवर वार, दोघांचाही मृत्यू

धक्कादायक! प्रेयसीवर हल्ला, नंतर स्वतःवर वार, दोघांचाही मृत्यू

Breaking News | Buldhana Crime: हॉटेल जुगनू येथे एक तरूण व तरूणीचा मृतदेह बंद खोलीत आढळून आला.

Attack on girlfriend, then stabs herself, both die

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बाह्यवळण परिसरात असलेल्या हॉटेल जुगनू येथे एक तरूण व तरूणीचा मृतदेह बंद खोलीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात मोठा जमाव जमला होता. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. हॉटेल जुगनूमधील एका खोलीत हे दोघेही दुपारपासून थांबलेले असल्याची हॉटेलकडून पोलिसांना माहिती देण्यात आली होती. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतःलाही भोसकून घेऊन आत्महत्या (Suicide) केली. खामगाव शहरातील हॉटेल जुगनूमधील या थरारक हत्याकांडाने शहर हादरलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बायपास परिसरात असलेल्या हॉटेल जुगनूमध्ये काल (मंगळवारी, ता 23) सायंकाळी जिल्ह्यातीलच साखरखेर्डा येथील प्रेमीयुगोलाने रूम भाड्याने घेतली. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीची भोसकून हत्या केली व त्यानंतर स्वतःलाही चाकूने सपासप वार करत संपवलं. सोनू राजपूत व पायल पवार असं या प्रेमीयुगोलाचे नाव असून दोघेही साखरखेर्डा गावातील होते. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. यावेळी खामगाव शहरात माहिती पसरतात मोठा जमाव या हॉटेल परिसरात जमला होता. यावेळी पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सौम्य बळाचा वापरही करावा लागला होता. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही तीन ते चार वर्षापासून प्रेम संबंधात होते.

अधिक माहिती अशी की, चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतःलाही भोसकून आत्महत्या माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. या घटनेत दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास उजेडात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये २१ वर्षीय युवती व सोनू उर्फ साहिल राजपूत (२३, दोघेही रा. साखरखेर्डा) यांचा समावेश आहे. काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातूनच साहिलने हॉटेलात युवतीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून केला. त्यानंतर स्वतःवर वार करत त्याने जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Breaking News: Attack on girlfriend, then stabs herself, both die

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here