Home संगमनेर संगमनेर: आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू

संगमनेर: आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू

Breaking News | Sangamner: आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाला. अंघोळीसाठी गरम पाणी अंगावर सांडल्याने दोघेही गंभीररित्या भाजले होते.

Grandmother and grandson die of suffocation

संगमनेर:  तालुक्यातील खळी कांगणवाडी येथे एका अत्यंत दुःखद घटनेत आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाला. अंघोळीसाठी गरम पाणी अंगावर सांडल्याने दोघेही गंभीररित्या भाजले होते. उपचारादरम्यान दोघांनीही प्राण गमावल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

संगमनेरातील खळी कांगणवाडी येथील रहिवासी कै. सिंधुबाई नामदेव सोसे (52 वर्षे) आणि त्यांचा नातू राहुल प्रकाश सोसे (5 वर्षे) यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. 8 सप्टेंबर 2025 रोजी पहाटेच्या सुमारास अंघोळीसाठी गरम पाणी त्यांच्या अंगावर सांडले. या अपघातात दोघेही जवळपास 60 टक्के भाजले, विशेषतः पाठीचा मागील भाग आणि पाय जास्त प्रभावित झाले. त्यांना तात्काळ प्रवरा ग्रामिण रुग्णालय, लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोघांचीही मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र 15 सप्टेंबर रोजी आजी सिंधुबाई सोसे यांचा मृत्यू झाला, तर काल मंगळवारी(23 सप्टेंबर) नातू राहुल प्रकाश सोसे याचीही प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सोसे कुटुंबावर आणि खळी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सिंधुबाई सोसे यांच्या पश्चात पती नामदेव सोसे, मुलगा प्रकाश सोसे, योगेश सोसे, दोन सुना, दोन मुली, जावई आणि नातवंडे, तर नातूच्या पश्चात एक छोटी बहीण गौरी व आई-वडील असा परिवार आहे. सोसे कुटुंबीय अत्यंत साधे, कष्टकरी आणि मनमिळाऊ म्हणून ओळखले जातात. या कठीण काळात कांगणवाडीतील सर्व ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला आणि कुटुंबाला धीर दिला, हे आजच्या काळातील माणुसकी जिवंत आहे याचा अनुभव देणारे आहे.

Breaking News: Grandmother and grandson die of suffocation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here