Home परभणी शेळ्या चारणाऱ्या तरुणीवर शेतात अत्याचार, तरूणाविरोधात गुन्हा

शेळ्या चारणाऱ्या तरुणीवर शेतात अत्याचार, तरूणाविरोधात गुन्हा

Breaking News | Sexual Assault Case | Parbhani: 19 वर्षीय तरुणीवर विनयभंग व अत्याचार झाल्याची घटना.

Young woman herding goats abused in a field

चारठाणाः जिंतूर तालुक्यातील कोलदंडी येथे 19 वर्षीय तरुणीवर विनयभंग व अत्याचार झाल्याची घटना 24 सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता शेतात शेळ्या चारत असताना गावातील महादेव उर्फ गोल्या अंकुश पिसाळ हा तेथे आला. त्याने तरुणीचा हात धरून ओढाताण केली, अश्लील भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.

या प्रकरणी आरोपी महादेव उर्फ गोल्या अंकुश पिसाळ (रा. कोलदंडी, ता. जिंतूर) याच्याविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 204/2025 भादंवि कलम 74, 296, 115(2), 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. झिंजुर्डे करीत आहेत.

Breaking News: Young woman herding goats abused in a field

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here