Home अहिल्यानगर अहिल्यानगर: पावसातून काहीसा दिलासा मिळणार

अहिल्यानगर: पावसातून काहीसा दिलासा मिळणार

Breaking News | Ahilyanagar Rain Update:  मुंबईसह कोकण व विदर्भ वगळता, उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 18 जिल्ह्यातून काहीसा दिलासा मिळणार.

There will be some relief from the rain

अहिल्यानगर: दसर्‍यानंतरच अपेक्षित उघडीप देण्याच्या शक्यतेला मुंबईसह कोकण व विदर्भ वगळता, उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 18 जिल्ह्यातून काहीसा दिलासा मिळणार आहे. या सर्व जिल्ह्यात पूर्णतः नव्हे, परंतु काहीशी उघडीपीची शक्यता असून केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचीच शक्यता आहे.

तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली असून मुंबईसह कोकण व विदर्भातील 18 जिल्ह्यात मात्र, दसर्‍यानंतरही तेथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. महाराष्ट्रावरून पाऊस पाडत सरकलेले हवेचे कमी दाब क्षेत्र सोमवारी सौराष्ट्रात पोहोचले असून पुढील 24 तासात ते अरबी समुद्रात उतरून पुन्हा तीव्र कमी दाबात रूपांतर होवून ते ओमानकडे मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. मात्र, देशात परतीच्या मार्गांवर असलेला मान्सून, शुक्रवार 3 ऑक्टोबरपर्यंत, वेरावळ भरूच उज्जैन झाशी शहाजहाणपूर या शहरादरम्यानच्या सीमारेषेवर पुढील पाच दिवस अजूनही जाग्यावरच थबकण्याची शक्यता आहे.

Breaking News: There will be some relief from the rain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here