आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली, मग कोयत्याने गळ्यावर सपासप वार करुन संपवलं
Breaking News | Kolhapur Crime: आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली त्यानंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून पत्नीची निर्घृण हत्या.
भादोले : कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली त्यानंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून पत्नीची निर्घृण हत्या केली. रोहिणी पाटील असं मृत महिलेचे नाव आहे, तर प्रशांत पाटील असं पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. प्रशांतने रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकून गळ्यावर सपासप वार केले, हत्या करून पळून गेलेल्या प्रशांत पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, , भादोले-कोरेगाव रस्त्यावरती भादोलेच्या हद्दीत पत्नी रोहिणी प्रशांत पाटील (वय २८, रा. भादोले, ता. हातकणंगले) हिच्या डोळ्यात त्याने चटणी टाकून आरोपी पती प्रशांत पाटील याने कोयत्याने वार केले, ही घटना काल (सोमवारी, ता २९) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. याची नोंद वडगाव पोलिसात रात्री उशिरा झाली. पती प्रशांत हा खून करून फरार झाला होता. त्याला रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भादोले येथील प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी हिच्यासमवेत तिच्या माहेरी ढवळी (जि. सांगली) येथे वडील आजारी असल्याने आठवडाभरापासून ये-जा करत होता. सोमवारी सायंकाळी ढवळी येथून पती-पत्नी दोघे भादोलेला येण्यासाठी मोटारसायकलने येत होते. दरम्यान, रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते कोरेगाव भादोले रस्त्यावर झुंजीनाना मळ्याजवळ हे दोघे आले असता प्रशांत याने रोहिणी हिच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार करून तिला संपवलं.
त्यानंतर तेथून भादोले येथे येऊन त्याने गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगून मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच-सहा महिने येणार नाही असे सांगून पळून गेला होता. या घटनेने गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संशयित आरोपी प्रशांत पाटील याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Breaking News: wife’s eyes, then he killed her by stabbing her in the neck.