Home बीड एका घरात वेश्या व्यवसाय, व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला ताब्यात

एका घरात वेश्या व्यवसाय, व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला ताब्यात

Breaking News | Beed Crime:  एका घरात वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्याप्रमाणे पोलिसांनी आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने संयुक्त कारवाई.

Prostitution business in a house, woman running the business detained

केज: केज येथील एका घरात वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्याप्रमाणे पोलिसांनी आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने संयुक्त कारवाई केली. यामध्ये पीडितेची सुटका करण्यात आली आणि व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी केज येथील उमरी रोडजवळील गणेश नगर भागात एका महिलेने आपल्या घरात वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत व अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास एक डमी ग्राहक पाठवून तपास सुरु केला. ग्राहक पीडित महिलेला रूममध्ये घेऊन जाताच पोलिसांनी धाड टाकून ५२ वर्षीय व्यावसायिक महिलेचा ताबा घेतला.

या कारवाईत पोलिसांनी पैसे जप्त केले. यामध्ये केज पोलिस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या महिला पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार बाळासाहेब अहंकारे, पोलीस शिपाई प्रकाश मुंडे, महिला पोलीस राधा चव्हाण आणि सुलोचना वाळके यांच्या सहभागात कारवाई करण्यात आली.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात ५२ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत नोंदवला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Breaking News: Prostitution business in a house, woman running the business detained

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here