अहिल्यानगर: दगडफेक प्रकरणी 30 जणांना तीन दिवस पोलीस कोठडी
Breaking News | Ahilyanagar: धार्मिक भावना दुखावल्याच्या निषेधार्थ कोठला परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 30 जणांना अटक केली.
अहिल्यानगर: धार्मिक भावना दुखावल्याच्या निषेधार्थ कोठला परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 30 जणांना अटक केली असून त्यांना मंगळवारी (30 सप्टेंबर) न्यायालयाने तीन दिवसांची (3 ऑक्टोबरपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. नगर शहरातील बारातोंटी कारंजा येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीतील मजकूरावरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. या प्रकारामुळे मुस्लिम समाजाने आक्रमक होत सोमवारी (29 सप्टेंबर) सकाळी अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर महामार्ग कोठला परिसरात रोखून करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.
जमाव एकाऐकीच आक्रमक झाला व त्यांनी दगडफेक सुरू केली. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले असून पोलीस जखमी झाले आहेत. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात सुमारे 150 ते 200 जणांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सुमारे 47 संशयितांचे नावे निष्पन्न केली असून त्यातील 30 जणांना अटक केली आहे. तसेच सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. त्यांना नोटीस देऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे.
महोमंद सरफराज इब्राहीम सय्यद ऊर्फ सरफराज जहांगिरदार (वय 37), फरदीर इरफान खान (वय 18, दोघे रा. मुकुंदनगर), जुनेद अमीर शेख (वय 38), सलमान आरिफ शेख (वय 23, दोघे रा. बेलदार गल्ली), गुलफान निहाउद्दीन अन्सारी (वय 25), शाहरूख फारूख शेख (वय 24), मुदस्सर शब्बीर शेख (वय 25, सर्व रा. कोठला), राजीक अफरोज कुरेशी (वय 22, झेंडीगेट), हमजा शाहिद शेख (वय 20), अल्तमश अल्ताफ शेख (वय 26), शाहबाज हरून शेख (वय 35), अकिल राजमोहंमद शेख (वय 24), जुबेर फारूख शेख (वय 30), जहेद जाहीद शेख (वय 20), राहिल मिराजमिया सय्यद (वय 28, सर्व रा. मुकुंदनगर), अक्रम रियाज शेख (वय 28, रा. तपोवन रस्ता, सावेडी), निसार दाऊद शेख (वय 51, रा. मंगलगेट), तबरेज ऊर्फ चाँदमिया मिर सय्यद (वय 25), अमीर अन्वर शेख (वय 29, दोघे रा. मुकुंदनगर), नदीम शौकत शेख (वय 21, रा. पिंपळगाव उजनी, ता. अहिल्यानगर), अदनान अल्ताफ अत्तार (वय 22 रा. मुकुंदनगर), सोहेल आयुब शेख (वय 23, रा. कोठला), इर्शाद जकीर शेख (वय 20 रा. मुकुंदनगर), जाकीर ताहिद शान ऊर्फ जावेद ताहिर खान (वय 25 रा. कोठला), जिशान कदीर अत्तार (वय 22), दानीश रज्जाक शेख (वय 35 दोघे रा. मुकुंदनगर), सादिक युनुस शेख (वय 30, रा. कराचीवालानगर), साकिन नौशाद सय्यद (वय 26, आलमगीर), मुजाहिद मुस्ताक कुरेशी (वय 33, नालबंद खुंट), सलिम हमिद बागवान (वय 32 रा. मुकुंदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
Breaking News: 30 people remanded in police custody for three days in stone-pelting case