Home पुणे खळबळजनक! आधी बायकोची हत्या, नंतर नवऱ्यानेही आयुष्य संपवलं….

खळबळजनक! आधी बायकोची हत्या, नंतर नवऱ्यानेही आयुष्य संपवलं….

Breaking News | Pune Crime: पतीने पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

Shocking incident of husband killing wife and committing suicide

पुणे: पतीने पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील रावणगावमध्ये ही घटना घडली. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती वादातून नवऱ्याने बायकोचा खून करून स्वतः आत्महत्या केली. दौंड तालुक्यातील रावणगावमधील रानमळा वस्ती परिसरात ही थरकाप उडवणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. नवऱ्याने बायकोची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर काही वेळातच त्याने राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन स्वत:ही आत्महत्या केली.

या दुहेरी मृत्यूनं गावात मोठी खळबळ उडाली आहे. जयश्री अशोक गावडे (वय 45 वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर बायकोची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव अशोक मारुती गावडे (वय 50 वर्षे) असे आहे. दोघेही शेती करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे मुलांना मोठा धक्का बसला आहे.

जयश्री आणि अशोक यांच्यामध्ये सतत वाद व्हायचा. नेहमीप्रमाणे रात्री त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. मध्यरात्रीच्या सुमारास या वादातून अशोक गावडेने जयश्री यांचा गळा दाबला आणि त्यांना जागीच संपवलं केला. त्यानंतर काही वेळातच संतापातून अशोक यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. सकाळी गावकऱ्यांना ही घटना समजताच एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलिस करत आहेत.

Breaking News: Shocking incident of husband killing wife and committing suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here