‘रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या मांडीवर…’; करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, ‘2009 पासून ….
Karuna Munde On Dhananjay Munde And Pankaja Munde : कठीण काळात मला माझ्या बहिणीने आधार दिला. हे वाक्य ऐकल्यानंतर करुणा मुंडेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
बीड: बीडच्या सावरगाव घाटावरील भगवान गडावरील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे, पंकजा आणि प्रीतम मुंडे एकत्र आलेत. महाराष्ट्रातील राजकारणातील मुंडे बहीण – भाव अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेक वर्ष राजकीय वैरी असलेले हे मुंडे बहीण भाऊ जेव्हा मंचावर एकत्र येतात, तेव्हा ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या दसऱ्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी त्यांच्या बहिणीचे कौतुक केलं. त्यानंतर करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे म्हणाले की, कठीण काळात मला माझ्या बहिणीने आधार दिला. हे वाक्य ऐकल्यानंतर करुणा मुंडेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्यात की, 2009 पासून 2022 पर्यंत जे दोन भाऊ-बहीण एकमेकांसाठी कट कारस्थान रचत होतं. आज त्याच बहिणीला आज आधार मानतात, ती किती त्रास देत होती. तुम्ही माझ्या मांडीवर रात्री दोन-दोन, तीन वाजेपर्यंत रडत होता आणि आज तिचा आधार वाटतो का? तुम्ही म्हणताय की शेतकरी लोकांना पंकजाताई न्याय देतील, कशाप्रकारे न्याय देतील? असा सवाल करुणा मुंडे यांनी केला.
कारखाना तुम्ही बंद केला आणि गोरगरीब लोकांचे पैसे न देता हे दोघे कारखाने तुम्ही बंद केले. आज भी ऊसतोड कामगारांचे पैसे 30-30, 40-40 कोटी दोघा कारखान्यांमध्ये अडकलेले आहेत पण तुम्ही देत नाही, असा गंभीर आरोपही करुणा मुंडेंनी यावेळी केला आहे.
त्या पुढे म्हणाल्यात की, आज पण तुमच्या सभांमध्ये वाल्मिक कराडचे पोस्टर मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आले. हे संकेत आहे की काय पण असू द्या, आमच्या पोटाच्या पाणी वाल्मिक कराडशिवाय ना हलत होतं, ना हलणार.., त्यासाठी आज तुम्हाला परळीमध्ये कोणी नवीन व्यक्ती नको आहे. जे गुंडागर्दी संपवतील. जरी माझ्यासारखा कोणी नवीन आला तर तो गुंडागर्दी संपवेल, राजकारण आहे ते संपवतील. त्याच्यासाठी तुम्ही दोघे भाई-बहीण एकत्र आलेले आहे. कोणत्याही जनतेची सेवा, शेतकऱ्यांची सेवेसाठी तुम्ही एकत्र आलेले नाही, असाही गंभीर आरोप करुणा मुंडेंनी केला.
दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे नेमकं काय म्हणालेत?
मेळाव्याच्या भाषणात धनंजय मुंडे म्हणाले की, गेले 250 दिवस माझी वाईट मानसिकता झाली होती. माझी बहीण माझ्या जवळ येऊन तास न् तास बसत होती. ज्या काळात मीडिया ट्रायल सुरू होतं, त्यावेळी माझ्या बहिणीने आधार दिला. माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांनी आधार दिला, असे विधान धनंजय मुंडेंनी केले होते. धनंजय मुंडे यांच्या याच विधानावर करुणा शर्मा-मुंडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी भाऊ-बहिणीच्या संबंधांवर, साखर कारखान्यांवर आणि राजकारणातील गुंडगिरीच्या मुद्द्यांवरून टीका केली आहे.
का होते चर्चा:
करुणा मुंडे हे नाव पहिल्यांदा 2021 मध्ये चर्चेत आलं. धनंजय मुंडे यांचं नाव घेत थेट त्यांच्यावर बलात्काराचे आरोप एका महिलेनं सोशल मीडियावरून केले होते. त्यानंतर करुणा शर्मांसोबत असलेलं नातंही उघड केलं होतं. तेव्हा धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मासोबत परस्पर संमतीने संबंध असून याची माहिती कुटुंबियांना असल्याचं सांगितलं होतं. करुणा यांच्या मुलांनाही माझं नाव दिलंय असं धनंजय मुंडे म्हणाले होते.
Breaking News: Karuna Munde On Dhananjay Munde And Pankaja Munde