संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा
Breaking News Raid | Sangamner Crime: दोन ठिकाणी कारवाया करुन साडेतीनशे किलो गोमांस जप्त करत दोघांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला.
संगमनेर: शहरातील अवैधरित्या चालणाऱ्या गोवंश कत्तलखान्यांवर कारवाया करुनही ते बंद होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शुक्रवारी (दि.३) सकाळी दहा वाजेच्या सुमारास वेगवेगळ्या दोन ठिकाणी कारवाया करुन साडेतीनशे किलो गोमांस जप्त करत दोघांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन त्यांनी पथकाला अवैधरित्या चालणाऱ्या गोवंश कत्तलखान्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने भारतनगर येथील कत्तलखान्यावर छापा टाकत शाहिद गणी कुरेशी (वय ४०, रा. जमजम कॉलनी, संगमनेर) याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे दीडशे किलो गोमांस जप्त केले. याप्रकरणी पोकॉ. राहुल सालबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शाहिद कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरी कारवाई याच परिसरातील कादरी मस्जिदजवळ करण्यात आली. मोहम्मद नईम अब्दुल अलीम कुरेशी (वय ३९, रा. मोगलपुरा, संगमनेर) याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे दोनशे किलो गोमांस आणि सुरा जप्त केला आहे. याप्रकरणी पोना. बापूसाहेब हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मोहम्मद कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहे. दरम्यान, वारंवार कारवाया करुनही गोवंश कत्तलखाने बंद होत नसल्याचेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Breaking News: Police raid illegal slaughterhouse in Sangamner