7 ऑक्टोबरचा मुहूर्त ठरला, राष्ट्रवादी शरद पवार गटाला भाजपचा सर्वात मोठा धक्का
Breaking News | Sangali Politics: राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते सुद्ध महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत, काही नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे, तर काही नेते हे भाजपच्या वाटेवर आहेत.
सांगली: विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठी गळती लागल्याचं पहायला मिळत आहे, महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे, शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते सुद्ध महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत, काही नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे, तर काही नेते हे भाजपच्या वाटेवर आहेत.
आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला सांगलीमध्ये आणखी एक धक्का बसला आहे. आमदार अरुण लाड यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ते येत्या सात ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटातील अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत, त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसला आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात आहे.
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.
Breaking News: NCP Sharad Pawar Group In Sangli Big Leader To Join BJP