केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोणी दौर्यावर
Breaking News | Ahilyanagar: पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ.
लोणी: केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वागतासाठी सहकार पंढरी सज्ज झाली असून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा परिवाराने जय्यत तयारी केली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ आणि लोणी बुद्रूक गावातील ग्रामस्थांनी उभारलेल्या पद्म स्मृती या स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी लोणी गावही भगवेमय झाले आहे.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह दुसर्यांदा लोणीमध्ये येत असून यापूर्वी सहकार परिषदेच्या निमित्ताने त्यांचे सहकार पंढरीत आगमन झाले होते. मंत्री विखे पाटील यांनी बाजारतळावर उभारलेल्या भव्य सभा मंडपाची पाहणी करून, तयारीचा आढावा घेतला. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना तसेच पद्म स्मृतीस्थळ आणि सभास्थळाचे भव्य नियोजन करण्यात आले आहे. आज रविवारी सकाळी केंद्रीय मंत्री अमित शाह साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर येणार आहेत. कारखान्याच्या नूतन प्रकल्पाचा शुभारंभ करून ते लोणी बुद्रूक गावामध्ये येतील. बसस्थानकाजवळील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून समोरच उभारलेल्या सभास्थळी पोहोचतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कोपरगाव: साखर उद्योगात नव्या युगाची सुरुवात झाली असून उसाच्या टाकाऊ पदार्थांपासून सीएनजी निर्मितीची क्रांतिकारी प्रक्रिया आता सुरू झाली आहे. कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा देशातील पहिला कारखाना ठरला आहे, जिथे ऊस प्रक्रियेतील वाया जाणार्या पदार्थांपासून थेट कॉम्प्रेस बायोगॅस (सीएनजी) व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युल निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी व शेतकरी सहकार मेळाव्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह अनेक मंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Business insurance, Auto insurance, Car insurance, Life insurance makes your life success. You don’t need to pray to God any more when there are storms in the sky, but you do have to be insured.”
Breaking News: Union Home Minister Amit Shah on a visit to Loni today