Home अहिल्यानगर अहिल्यानगर: बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

अहिल्यानगर: बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

Breaking News | Ahilyanagar Crime: मृतदेह राहुरी खुर्द येथील एका मंदिरामागील काटेरी झुडपामध्ये आढळून आला.

Rahuri Body of missing youth found

राहुरी : राहुरी खुर्द येथून पाच दिवसांपूर्वी विवाहित तरुण बेपत्ता झाला होता. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह राहुरी खुर्द येथील एका मंदिरामागील काटेरी झुडपामध्ये आढळून आला. शंकर छबू बर्डे (वय ४१) हा विवाहित तरुण कुटुंबासह राहुरी खुर्द येथे राहत होता.

पाच दिवसांपूर्वी तो घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही. याबाबत त्याचा भाऊ विजय बर्डे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दि. २९ सप्टेंबरला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिस पथकाकडून त्याचा शोध सुरू असताना शनिवारी (दि. ४) शंकर बर्डे याचा मृतदेह मंदिरालगत असलेल्या काटेरी झुडपामध्ये सडलेल्या अवस्थेत मिळून आला. घटनेची माहिती कळताच हवालदार अर्जुन दारकुंडे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. शंकर बर्डे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

Business insurance, Auto insurance, Car insurance, Life insurance makes your life success. You don’t need to pray to God any more when there are storms in the sky, but you do have to be insured.”

Breaking News: Rahuri Body of missing youth found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here