Breaking News | Ahilyanagar: बसस्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय माळीवाडा बसस्थानक परिसरातील प्रकार.
अहिल्यानगर: मध्यवर्ती आणि नेहमी गजबजलेल्या माळीवाडा बसस्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय तिच्या मावस भावाने व्यक्त केला आहे. त्याच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी असून तो जामखेड येथे मावशीकडे गेला होता. शुक्रवारी (दि. ३) रोजी तो अल्पवयीन मावस बहीणला घेऊन घरी श्रीरामपूरला परतण्यासाठी निघाला होता. प्रवासादरम्यान राशीन येथे देवीचे दर्शन घेऊन ते सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नगरमधील माळीवाडा बसस्थानकावर पोहोचले. श्रीरामपूरकडे जाणारी बस किती
वाजता आहे, हे पाहण्यासाठी फिर्यादी बसस्थानकात गेला आणि मुलीला बाहेर थांबायला सांगितले. मात्र, काही मिनिटांतच तो परत आला असता, मुलगी त्याठिकाणी दिसली नाही. आजूबाजूला शोध घेऊनही ती न सापडल्याने फिर्यादीने अखेर कोतवाली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Breaking News: Ahilyanagar Kidnapping of a minor girl