Home संगमनेर थोरात सहकारी साखर कारखाना उसाला ३२०० रुपये भाव देणार

थोरात सहकारी साखर कारखाना उसाला ३२०० रुपये भाव देणार

Breaking News | Sangamner: यावर्षी कारखाना उसाला प्रतिक्विंटल ३२०० रुपये भाव देणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात.

Thorat Cooperative Sugar Factory will offer sugarcane at a price of Rs. 3200

संगमनेर: स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम काटकसर, अचूकता व पारदर्शक निर्णय घेत चांगली वाटचाल केली आहे. यावर्षी कारखाना उसाला प्रतिक्विंटल ३२०० रुपये भाव देणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

सोमवारी कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे, कारखान्याचे माजी अध्यक्ष बाबा ओहोळ, कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, घुलेवाडीच्या सरपंच निर्मला राऊत यांसह संपत डोंगरे, लक्ष्मण कुटे,

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन समारंभावेळी बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे आदी.

संचालक संतोष हासे, संपत गोडगे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, सतीश वर्षे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

कारखानदारीमध्ये मोठी स्पर्धा आहे. उसाची पळवापळवी होणार आहे. दरवर्षी किमान ९ लाख मेट्रिक टन गाळप होणे गरजेचे आहे. थोरात कारखान्याने १५ लाख मेट्रिक टनापर्यंत गाळप करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील सभासद त ऊसउत्पादकांचा कारखान्यावर कायम मोठा विश्वास राहिला आहे. आगामी काळामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एकरी उत्पादन वाढविणे अत्यंत गरजेचे आहे, असेही थोरात म्हणाले.

Breaking News: Thorat Cooperative Sugar Factory will offer sugarcane at a price of Rs. 3200

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here