Home अहिल्यानगर अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीस धमकी, पोक्सोचा गुन्हा दाखल

अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीस धमकी, पोक्सोचा गुन्हा दाखल

Breaking News | Ahilyanagar: अल्पवयीन मुलीचा हात धरत तिला फिरायला नेण्यासाठी धमकावण्यात आले. तिच्या वडिलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी.

Threat to minor girl, POCSO case registered

श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव परिसरात अल्पवयीन मुलीचा हात धरत तिला फिरायला नेण्यासाठी धमकावण्यात आले. तिच्या वडिलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देण्यात आली.

पोलिसांनी आरोपी नासिर हसन शेख (रा. पढेगाव) याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत पीडितेच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

पीडित मुलगी (वय १२) ही तालुक्यातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. ती तिच्या मामाकडे राहत आहे. २२ सप्टेंबरला पीडितेच्या वडिलांचे व आरोपीचे वाद झाले. नासीर हा वारंवार दारूच्या नशेत त्यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत असे. गावात ४ ऑक्टोबरला पीडित मुलीची आई ही कामानिमित्त बाहेर गेली होती. संध्याकाळी परत येत असताना पीडित मुलगीही त्यांच्याबरोबर होती. सायंकाळी नासीर शेख हा त्यांच्या दारात उभा राहून शिवीगाळ करीत होता. त्यावेळी मुलीने आईला सकाळी घडलेली घटना सांगितली. आरोपीचा शोध सुरू आहे.

Breaking News: Threat to minor girl, POCSO case registered

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here