अहिल्यानगर: मातंग समाजातील तरुणावर प्राणघातक हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक
Breaking News | Nevasa: काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

नेवासा: नेवासा तालुक्यातील सोनई येथे मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर याच्यावर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात संजय वैरागर गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बहुजन जनता पक्षाने केली आहे.
अहिल्यानगरच्या नेवासा येथे जुन्या वादातून नितीन वैरागर यांना बेदम मारहाण करण्यात आली, ज्यात त्यांचा डोळा निकामी झाला. वंचितकडून या घटनेचा निषेध करण्यात आला असून, उद्या प्रकाश आंबेडकर वैरागर यांची भेट घेणार आहेत.
Breaking News: attack on a youth from Matang community

















































