‘ताई, इथून एसटी मिळणार नाही…’ दुचाकीवर लिफ्ट दिली अन् धमकी देत अत्याचार
Breaking News | Pune Crime: रात्रीच्या वेळी लिफ्ट देण्याचा बहाणा करून महिलेस मोटारसायकलवर बसवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार.

इंदापूर: रात्रीच्या वेळी लिफ्ट देण्याचा बहाणा करून महिलेस मोटारसायकलवर बसवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करणाऱ्या आरोपीला भिगवण पोलिसांनी अटक केली. जाक्या कोंडक्या चव्हाण (वय ३०, रा. माळवाडी, लिंगाळी, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी १० ऑक्टोबरला इंदापुरातील भिगवण गावच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावरील ‘विकास इंजिनिअरिंग हार्डवेअर’ दुकानासमोर पहाटे सुमारे सव्वा तीन वाजता एक महिला गाडीची वाट पाहत उभी राहिली होती. यावेळी जाक्या चव्हाण याने महिलेला “ताई, इथून एसटी मिळणार नाही, तुम्ही माझ्या गाडीवर बसा” असे सांगून तिचा विश्वास संपादन केला.
आरोपीने तिला पुण्याच्या दिशेने नेऊन मळद (ता.दौंड) गावच्या हद्दीत रेल्वे ब्रिजजवळ झाडाझुडपात ओढून नेऊन शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडीत महिलेने भिगवण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी विशेष पथके स्थापन करून तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तसेच संशयिताचे रेखाचित्र तयार करण्यात आले. गोपनीय सूत्रांच्या मदतीने संशयित चव्हाण यास ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
Breaking News: Gave a lift on a bike and threatened and abused

















































