दिवाळी फराळामुळे कार्यकर्त्यांचे तोंड गोड – माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील
Breaking News | Shrirampur Election: आगामी नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शहरात दिवाळी फराळाचे आयोजन . सर्वपक्षीयांकडून श्रीरामपुरात केले फराळाचे आयोजन.

श्रीरामपूर : आगामी नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शहरात दिवाळी फराळाचे आयोजन केले जात आहे. यात सर्वच राजकीय पक्षांकडून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले जात आहे. दिवाळीनिमित्त फराळाच्या माध्यमातून राजकीय पेरणी सुरू असल्याची चर्चा आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते आमदार हेमंत ओगले, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, माजी आमदार लहू कानडे, अशोक कानडे, तसेच माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. अजूनही इतर नेत्यांच्या फराळाचे आयोजन होणार आहे. यंदाची दिवाळी ही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साजरी केली जात आहे. त्यामुळे त्याला राजकीय रंग मिळाला आहे.
दिवाळी फराळाच्या माध्यमातून सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे दंड थोपटले आहेत. शहरात दिवाळी फराळाच्या आयोजनाची परंपरा आहे. मात्र, यंदा नेत्यांसह कार्यकर्ते उत्साहात दिसून येत आहेत. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही येथे पत्रकार परिषदेमध्ये दिवाळी फराळाच्या आयोजनावर मिश्किल टिप्पणी केली. दिवाळी फराळामुळे कार्यकर्त्यांचे तोंड गोड होते ही आनंदाची गोष्ट आहे. दिवाळी फराळ अनेक ठिकाणी होत असले तरी आचारी मात्र सर्वच ठिकाणी एकच आहे. त्यामुळे त्यालाही रोजगार मिळाल्याचे विखे यांनी म्हटले आहे.
Breaking News: Elections Diwali snacks make workers happy – Former MP Dr. Sujay Vikhe Patil
















































