Home अहिल्यानगर फॉर्च्युनर पलटल्याने तिघा साईभक्तांचा मृत्यू, नगर येथे खड्ड्याने घेतला एकाचा बळी

फॉर्च्युनर पलटल्याने तिघा साईभक्तांचा मृत्यू, नगर येथे खड्ड्याने घेतला एकाचा बळी

Breaking News | Ahilyanagar: चालकाचे फॉर्च्युनर गाडीचे नियंत्रण सुटल्याने सुरतहून शिर्डीकडे निघालेल्या तिघा साईभक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

Three Sai devotees die after Fortuner overturns, one dies in a pothole in Nagar

नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर चालकाचे फॉर्च्युनर गाडीचे नियंत्रण सुटल्याने सुरतहून शिर्डीकडे निघालेल्या तिघा साईभक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येवला तालुक्यातील एरंडगाव-रायते शिवारात फॉर्च्युनर गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीने तीन पलटी घेतल्या. यात तिघा साईभक्तांचा मृ्त्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींवर नाशिक येथे उपचार सुरु असून या प्रकरणाचा अधिक तपास येवला पोलिस करत आहेत.

कोपरगाव येथील आदित्य देवकर यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. येवला नाका येथे बजाज शोरूमसमोर मध्यरात्री ही घटना घडली आहे. महामार्गावरील खड्डे आणि त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे खडड्‌यात आदळून पडलेल्या तरुणाच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. नगर – मनमाड महामार्गावरील खड्ड्यांनी पुन्हा एकदा एका तरुणाचा बळी गेला आहे. रस्त्यांतील खड्ड्यांविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Breaking News: Three Sai devotees die after Fortuner overturns, one dies in a pothole in Nagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here