Breaking News | Sangamner Accident: कारच्या धडकेतील जखमी तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू.

संगमनेर : कारच्या धडकेतील जखमी तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुनील ज्ञानदेव सातपुते (वय ४०, रा. चिंचपूर, ता. संगमनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. ३ नोव्हेंबरला रात्री ८:१५ च्या सुमारास सातपुते हे त्यांच्या दुचाकीवरून संगमनेर येथून चिंचपूर येथे जात होते.
दरम्यान, कोल्हार-घोटी राज्य मार्गावर कोकणगाव शिवारात सातपुते हे प्रवास करीत असलेल्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या कारची धडक बसली. या अपघातात सातपुते हे गंभीररीत्या जखमी झाल्यानंतर त्यांना संगमनेर शहरातील आणि त्यानंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते त्यांना पुन्हा संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता ९ नोव्हेंबरला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे बंधू मिलिंद सातपुते (रा. चिंचपूर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Breaking News: Young man dies in car crash Accident
















































