Breaking News | Akole: माजी मंत्री दिवंगत मधुकरराव पिचड यांची नात गिरिजा पिचड म्हात्रे यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पिचड घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय.

अकोले : माजी मंत्री दिवंगत मधुकरराव पिचड यांची नात गिरिजा पिचड म्हात्रे यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे पिचड घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.
काही दिवसांपूर्वी गिरिजा पिचड यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती, यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर नवले, शिवाजी नेहे उपस्थित होते.
काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे त्यांनी अधिकृतरीत्या प्रवेश केला. यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते. गिरिजा पिचड यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील काँग्रेस अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
स्वर्गीय मधुकरराव पिचड यांची मोठी कारकीर्द ही काँग्रेस पक्षात गेली होती. मात्र, १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी पिचड यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. आता पुन्हा १९९९नंतर २०२५ पिचड घराण्यातील राजकारण करू इच्छिणारी त्यांची नात गिरिजा पिचड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हा प्रवेश आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे बोलले जात आहे.
Breaking News: Girija Pichad joins Congress party
















































