निवडणूक काळात तलवार घेऊन फिरणाऱ्यास अटक; ४ तलवारी जप्त
Breaking News | Beed Crime: नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रधारकांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, बीड शहर पोलिसांनी अजीजपुरा भागात तलवार घेऊन फिरत असलेल्या एका व्यक्तीस अटक.

बीड: नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रधारकांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, बीड शहर पोलिसांनी अजीजपुरा भागात तलवार घेऊन फिरत असलेल्या एका व्यक्तीस अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपीकडून चार तलवारी जप्त केल्या आहेत.
शेरसिंग हिंदू सिंग टाक (वय अंदाजे ५५, रा. वडवणी, ता. वडवणी, जि. बीड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून आणखीही अवैध शस्त्रे मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अवैध शस्त्रे जप्त करण्याच्या अनुषंगाने बीड शहर पोलिसांनी तत्परता दाखवत ही कारवाई केली आहे. कोणाकडेही अवैध शस्त्र, तलवार, दारुगोळा किंवा गावठी पिस्तूल असल्याची माहिती असल्यास संबंधित पोलिस ठाण्यास कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन बीड शहर पोलिसांनी केले आहे. दरम्यान, ही कारवाई पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि खेडकर, उपनिरीक्षक महेश जाधव, गणेश कुमावत तसेच अंमलदार गहिनीनाथ बावनकर, राम पवार, सुशेन उगले, इलियास शेख यांनी केली आहे.
Breaking News: Man arrested for carrying sword during election period 4 swords seized
















































