हृदयद्रावक! तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं
Breaking News | Nashik Crime: डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.

नाशिक : नाशिकच्या मालेगावमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या अतिशय हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण गाव हादरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित आरोपी विजय खैरनार याला ताब्यात घेतले. तर चिमुरडीचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या भयावाहघटनेमुळे परिसरात भीती आणि प्रचंड रोषाचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत.
Breaking News: three-year-old girl was brutally abused and murdered
















































