संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी डॉ. मैथिली तांबे तर विरोधी खताळ
Breaking News | Sangamner Muncipal Election: नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संगमनेर – संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत ‘संगमनेर सेवा समिती’ ने आपले सर्वच्या सर्व उमेदवार जाहीर करत विकासाचा एक ठोस आराखडा संगमनेरकरांसमोर ठेवला आहे. तर दुसरीकडे, महायुतीनेही नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे.
या निवडणुकीतील नगराध्यक्षपदाची मुख्य लढत आता लक्षवेधी ठरली आहे. महाविकास आघाडीचे समर्थन असलेल्या संगमनेर सेवा समितीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा संदीप खताळ (सुवर्णा विठ्ठल राहणे) यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
‘संगमनेर सेवा समिती’ चे सर्व ३० उमेदवार जाहीर दरम्यान, आमदार सत्यजित तांबे यांच्या
नेतृत्वाखालील संगमनेर सेवा समितीने नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व ३० नगरसेवकपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत, यामुळे त्यांनी निवडणुकीची तयारी पूर्ण केल्याचे चित्र आहे.
संगमनेर सेवा समितीचे उमेदवार
नगराध्यक्ष पदासाठी डॉ. मैथिली सत्यजित तांबे
प्रभाग १ अ खटाटे सिमा महेश
प्रभाग १ ब – पुंड दिलीप सहदेव
प्रभाग २ अ बोन्हाडे भारत चंद्रभान
प्रभाग २ ब – दिघे अर्चना सुभाष
प्रभाग ३ अ – कासार सौरभ विवेक
प्रभाग ३ ब – शोभा बाळासाहेब पवार
प्रभाग ४ अ – काशीद प्राची भानुदास
प्रभाग ४ ब – पवार किशोर हिरालाल
प्रभाग ५ अ – सातपुते अनुराधा निलेश
प्रभाग ५ ब – मुर्तडक विश्वास रतन
प्रभाग १२ अ – टोकसे किशोर बद्रीनारायण
प्रभाग १२ ब – शाह प्रियंका श्रीपाल
प्रभाग १३ अ कतारी कविता अमर –
प्रभाग १३ ब – शैलेश श्रीगोपाल कलंत्री
प्रभाग १४ अ- गरुडकर नंदा मुकुंद
प्रभाग १४ ब- पवार प्रसाद जयवंत
प्रभाग १५ अ – मुजीबखान अब्दुल्लाखान पठाण
प्रभाग १५ ब – पठाण नसीमबानो इसहाकखान
प्रभाग ८ अ – पंचारिया दिपाली जीवन
प्रभाग ८ ब – गुंजाळ श्री गणेश रंगनाथ
प्रभाग ९ अ पठाण अमजदखान उमरखान
प्रभाग ९ ब – गुंजाळ विजया जयराम
प्रभाग १० अ – बेग शकीला इलियास बेग
प्रभाग १० ब – शेख नूरमोहम्मद पीरमोहम्मद
प्रभाग ११ अ – पगडाल सरोजना संदीप
प्रभाग ११ ब – खान शहनवाज रईस
प्रभाग ६ अ वनिता संजय गाळे
प्रभाग ६ ब – गजेंद्र बजाबा अभंग
प्रभाग ७ अ डाके मालती धनंजय
प्रभाग ७ व अभंग नितीन बाजीराव –
निवडणूक निकाल 3 डिसेंबर ला जाहीर होणार असल्याने विजय कोणाचे हे पाहणे औचित्य ठरणार आहे.
Breaking News: Dr. Maithili Tambe for the post of Mayor for the Sangamner Municipality elections
















































