Home अहिल्यानगर इंदोरीकर महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, ; विधवा महिलांबद्दल म्हणाले…पुन्हा नव्या वक्तव्यामुळे चर्चेत

इंदोरीकर महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, ; विधवा महिलांबद्दल म्हणाले…पुन्हा नव्या वक्तव्यामुळे चर्चेत

Breaking News | Indorikar Maharaj: मुलीच्या साखरपुड्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. मात्र सावधगिरी बाळगण्याऐवजी इंदोरीकर महाराज पुन्हा नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले.

Indurikar Maharaj's controversial statement again

Indurikar Maharaj VIDEO: निवृत्ती महाराज इंदोरीकर मागील अनेक दिवसांपासून मुलीच्या साखरपु्ड्याच्या भव्य कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. इंदोरीकर महाराजांनी कधीकाळी केलेल्या वक्तव्यावरून मुलीच्या साखरपुड्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. मात्र सावधगिरी बाळगण्याऐवजी इंदोरीकर महाराज पुन्हा नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.   

विनोदी शैलीतून समाज प्रबोधन करण्याच्या नादात इंदोरीकर महाराज यांनी पती गेल्यावर शिकलेली पत्नी अधिक तमाशा करत असल्याचं विधान केलंय. शिर्डीत झालेल्या किर्तनात इंदोरीकर यांनी मनुष्य मयत झाल्यावर काय काय घटनाक्रम घडतो याचं कथन केलं.

यात स्वतःच्या मृत्यूचा दाखला देत त्यांनी आपली पत्नी काय काय करेल हे सांगितलं. पण हे सांगताना घरचा कर्ता पुरुष, आयुष्याभराचा जोडीदार गेल्यानंतर संबधित पत्नीला होणाऱ्या वेदनांना इंदोरीकरांनी चक्क तमाशा म्हटलं. खरंतर इंदोरीकर नेहमीच आपल्या विनोदी शैलीतून किर्तनाच्या माध्यमातून समाजात नवीन पिढीला खडेबोल सुनावतचं असतात. मात्र अलिकडे एखाद्या दुःखद प्रसंगाला विनोदी म्हणून वापरणं आणि त्यावर हश्या आणि टाळ्या मिळवणं हे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या प्रतिमेला नक्कीच न शोभणारं आहे.

माध्यमांवर राग धरणारे इंदोरीकर कीर्तनाचे जाहीर कार्यक्रम करतात. याची त्यांना आयोजकांकडून बिदागी देखील मिळते.  दिवसात तीन-तीन कीर्तन करत असल्याचं ते स्वतः सांगत असतात. जाहीर कार्यक्रमात आपला वाचाळपणा जगजाहीर होऊ नये, तसेच अडचणीत सापडू नयेत म्हणून ते चालू कीर्तनात चक्क कॅमेरामनला झापतात. कॅमेरेबंद करण्यास भाग पाडतात. एकदा कॅमेरा बंद झाल्याचं लक्षात आलं की मग इंदोरीकर महाराज आपल्या विनोदी शैलीत कीर्तनात अनेकदा मर्यादा ओलांडतात. मात्र या नव्या वक्तव्यावर आता इंदोरीकर महाराज काय स्पष्टीकरण देतात हे देखील पाहावं लागेल.

Breaking News: Indurikar Maharaj’s controversial statement again

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here