Home जळगाव धक्कादायक! सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धक्कादायक! सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Breaking News | Jalgaon Crime: आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सावत्र वडिलांनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली.

Minor girl raped by stepfather

जळगाव: अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच एक संतापजनक प्रकार समोर आलोय. आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सावत्र वडिलांनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तराखंड आणि जळगावातील पोलिस वसाहतीमध्ये घडला. याप्रकरणी उत्तराखंड येथील रहिवासी सावत्र वडिलांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात

पीडिता पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेची मुलगी आहे.पोलिस दलात कार्यरत महिला कर्मचारी मुलीसह पोलिस वसाहतीमध्ये राहते. पतीशी घटस्फोट झाल्यानंतर विवाह जुळविणाऱ्या वेबासाइटवरून परिचय झाल्याने तीन वर्षांपूर्वी उत्तराखंड येथील इसमासोबत पुनर्विवाह झाला. सन २०२४मध्ये दिवाळीची सुटी घालविण्यासाठी सदर महिला पोलिस व तिची १५ वर्षीय मुलगी उत्तराखंड येथे गेली होती. तेथे १५ दिवसांच्या वास्तव्यादरम्यान मुलीचे सावत्र बापाने आक्षेपार्ह व्हिडीओ करीत मुलीलाच पाठविला. त्यानंतर नराधमाने तिच्यावर जळगाव व उत्तराखंड येथे अत्याचार केला.

पीडितेच्या आईने सामाजिक कार्यकर्त्यासोबत घेऊन जिल्हा पेठ पोलिस ठाणे गाठले. पीडितेसह तिच्यासोबत आलेल्या महिलेला तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे हे पोलिस ठाण्यात पोहचले. त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पहाटे तीन वाजता सावत्र बापाविरूद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Breaking News: Minor girl raped by stepfather

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here